बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग पाच वर्ष विराट कोहली अँड टीमनं केला नवा विक्रम; मात्र, न्यूझीलंडकडून धोका

नवी दिल्ली | विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सलग पाचव्या वर्षी ‘आयसीसी’च्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे. ‘आयसीसी’नं गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने 121 गुणांसह पहिलं स्थान कायम राखले आहे, तर 120 गुणांसह न्यूझीलंडही दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. भारतीय संघ 2017, 2018, 2019, 2020 व 2021 या सलग पाच वर्षांत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.

भारतीय संघाने सातव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये पहिलं स्थान कायम राखताना कसोटीची मानाची गदा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियानं 9 वेळा हा पराक्रम केला आहे. भारतीय संघानं एक रेटिंग गुणासह 121 गुणांची कमाई केली आहे, तर न्यूझीलंड 1 गुणांनी पिछाडीवर आहे. भारतीय संघानं 2-1 अशा फरकानं ऑस्ट्रेलियावर, तर 3-1 अशा फरकानं इंग्लंडवर विजय मिळवला आहे.

पाकिस्तानने 3 गुणांची कमाई करताना पाचवे स्थान पटकावले आहे, तर वेस्ट इंडिजने बांगलादेशवर 2-0 असा विजय मिळवला आणि श्रीलंकेविरुद्ध 0-0 अशा निकालाच्या जोरावर सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

दरम्यान,  2013 नंतर ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. दक्षिण आफ्रिका सातव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यास ते अव्वल स्थानी विराजमान होतील. जूनमध्ये जागतीक कोसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

Image

थोडक्यात बातम्या – 

अजित पवारांना ‘या’साठी हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी त्यासाठी करणार इतके कोटी खर्च

धोनीच्या संघातील ‘हा’ खेळाडू बनणार भारतीय संघाचा नवा ऑलराऊंडर, घेणार हार्दिक पांड्याची जागा!

मनसे नेते अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले…

“भर चौकात उभं नाही केलं तर माझं नाव रंजीत रंजन नाही”

100 वर्षांआधीचं ‘हे’ औषध ठरतयं ब्लॅक फंगसवर गुणकारी भारतीय डाॅक्टरचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More