…अखेर कर्णधार विराट कोहलीचं अनिल कुंबळेला उत्तर

पोर्ट ऑफ स्पेन | वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी माध्यमांशी बोलताना कर्णधार विराट कोहलीनं अनिल कुंबळेच्या राजीनाम्यावरील आपलं मौन सोडलंय. 

कोहलीनं अनिल कुंबळे मुद्द्यावर काहीही ठोस भाष्य केलं नाही,मात्र राजीनामा देण्याच्या अनिल कुंबळेच्या निर्णयाचा मी आदर करतो, असं कोहली म्हणाला.

तसंच ड्रेसिंग रुममध्ये काय घडतं, याची वाच्यता करणाऱ्यातला मी नाहिये. तिथलं पावित्र्य राखण्याचा मी प्रयत्न करेन, असं म्हणून कोहलीने एकप्रकारे अनिल कुंबळेला टोला लगावलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या