मुंबई | नुकतंच आयसीसीने आंतराराष्ट्रीय सामन्यातील एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधील खेळाडूंची रँकिंग जाहीर केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यातील रँकिंगमध्ये नंबर 1 चा खेळाडू ठरला आहे. तर कोहलीला टी-20 क्रिकेट रँकिंगमध्ये फटका बसला आहे, त्याची रँकिंग घसरून तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने चांगली कामगिरी केली होती, त्याचा फायदा त्याला रँकिंगमध्ये झाला आहे.
विराट कोहली एकदिवसीय सामन्यात 870 गुण मिळवून एकदिवसीय सामन्यातील रँकिंगमध्ये नंबर 1 चा खेळाडू बनला आहे. तर या यादीमध्ये भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने तिसऱ्या स्थानी झेल घेतली आहे. तर या दोघांच्यामध्ये पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत केएल राहुल 27 व्या क्रमांकावर असून, हार्दिक पांड्या 42 व्या स्थानावर आला. तर दुसरीकडे भारताचा आक्रमक फलंदाज रिषभ पंतने देखील टाॅप शंभर खेळाडूंच्या यादीत आपलं नाव पटकावलं आहे.
गोलंदाजाच्या यादीत भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या नंबरवर पोहोचला आहे. आधी तो तिसऱ्या स्थानी होता. बुमराह इंग्लंड विरूद्धची मालिका खेळला नव्हता. इंग्लंड विरूद्ध चांगली कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार पुन्हा 11 व्या स्थानी आला आहे. तर शार्दुल ठाकूरने 12 अंकाची झेप घेऊन 80 व्या स्थानी मजल मारली आहे.
दरम्यान, कसोटी रँकिंगमध्ये न्युझीलंडच्या केन विल्यमसनने बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर कसोटी रँकिंगमध्ये कोहलीचा 5व्या स्थानी नंबर लागला आहे. तर रोहित शर्मा 9व्या स्थानी पोहचला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘हा केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, की…’; सुब्रमण्यम स्वामी मोदी सरकारवर बरसले
बेड मिळत नसल्याने ॲाक्सिजन सिलेंडरसह आंदोलन केलेल्या रुग्णांचा मृत्यू
सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला शरद पवार यांचे नाव!
तृप्ती देसाई यांची पीडितेसह पत्रकार परिषद, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचे आरोप
पुन्हा नशिबी फरपट? लॉकडाऊनची भीती, परप्रांतिय मजुरांची घराकडे जाण्यासाठी धावपळ!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.