Top News खेळ मनोरंजन

सचिनचा मुलगाच नव्हे तर सेहवागचा ‘हा’ नातलगही IPLच्या रणांगणात!

Photo Courtesy-facebook/Virender sehwag

चेन्नई | एकीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएल लिलावात उतरला आणि नेटकऱ्यांना टोमणे मारण्याची संधीच मिळाली. भारतासाठी खेळलेल्या आणखी एका खेळाडूचा नातलग आयपीएल लिलावात सुमडीत उतरला आहे.

भारताचा माजी आक्रमक सलामवीर फलंदाज वीरेंद्र सेेहवाग याचा पुतण्या मयंक डागरला आयपीएल लिलावात उतरण्याची संधी मिळाली आहे. मजेशीर गोष्ट अशी, की आयपीएल लिलावाच्या काही मिनिटांपूर्वी मयंक डागरला लिलावात संधी मिळाली. मयंकने प्रथम श्रेणी सामन्यात 23 सामन्यात 64 गडी बाद केले  आहेत तर 31 टी ट्वेन्टी सामन्यात 29 विकेट त्याच्या नावावर आहेत.

याआधी देखील 2018 मध्ये मयंकला किंग्ज इलेव्हन पंजाबने मुळ किंमतीत म्हणजेच 20 लाखात घेतले होते. परंतू तो एकही सामना खेळू शकला नव्हता. मयंकशिवाय ऑस्ट्रेलियाचा जेवियर बार्लोट, के डी रोहित, राजस्थानचा अशोक मेनारिया, उत्तर प्रदेशचा फिरकीपटु सौरभ कुमार यांनाही शाॅट लिस्ट करण्यात आलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अंकिताने बिकीनीमध्ये टाकला फोटो, सुशांतचे फॅन चांगलेच भडकले, म्हणाले…

नाद करा पण प्रीति झिंटाचा कुठं???; शाहरुख खानलाच विकत घेतलं!

घरात सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या पैशांसोबत असं काही घडलं, सारेच झालेत हैराण!

“राज्यातील काँग्रेसचे नेते बॉलिवूडच्या अभिनेत्यांना धमक्या देत आहेत”

बोली वाढत होती मात्र चेन्नई हटली नाही, त्या खेळाडूला अखेर घेतलंच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या