विरेंद्र सेहवागनं महिला क्रिकेटसंघाला दिला ‘हा’ कानमंत्र

मुंबई | आयसीसी टि-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांच्या संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यासाठी भारतीय पुरुष संघाचा खेळाडू विरेंद्र सेहवागने पुढील सामन्यासाठी कानमंत्र दिला आहे. 

गुरुवारी झालेल्या आर्यलँडविरूद्धचा सामन्याच्या विजयासाठी सेहवागने संघाचे अभिनंदन केले आहे. या सामन्यात भारताने आर्यलँडसमोर विजयासाठी 146 धावांचे आव्हान ठेवले होते. आर्यलॅंडला मात्र ते पेलता आले नाही आणि भारताचा 52 धावांनी विजय झाला.

उपांत्य फेरीत धडक मारल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन. तुम्हाला उर्वरित स्पर्धेसाठी शुभेच्छा सेहवागने ट्वीटरवरून दिल्या आहेत. 

दरम्यान, पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून तुम्ही गुणतक्त्यात अव्वल क्रमांक कायम राखा, असा कानमंत्रही त्याने संघाला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाकावं!

-उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजपवाले जनतेला मूर्ख बनवतायेत!

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडणुकीसाठी करतोय असा प्रचार

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

-…तर गांधी घराण्याच्या बाहेरील काँग्रेस अध्यक्ष करून दाख