देश

अयोध्याप्रकरणाच्या निर्णयावर वीरेंद्र सेहवागचं खास ट्विट, म्हणाला…

नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा रामलल्लाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आहे. या निकालानंतर भारतीय संघाचा माजी  सलामीवीर विरेंद्र सेहवागनं ट्विट केलं आहे

श्री राम जय राम जय जय राम !,अशा मोजक्या शब्दात सेहवागनं ट्विट केलं आहे. त्यासोबतच ट्विटमध्ये  प्रभू श्रीरामांचा फोटो पोस्ट केला आहे. देशातील सर्वांनी शांततेने एकात्मतेने आणि बंधुभावाने रहा, असं कॅप्शन देत रामांचा फोटो इनस्टाग्रामवरही सेहवागनं पोस्ट केली आहे. सेहवागच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत एकूण 67 एकर जागा आहे. या एकूण जागेपैकी 2.77 एकर जागेबाबतच वाद होता. त्यामुळे न्यायालयाने फक्त एवढ्याच वादग्रस्त जागेवर निकाल दिला आहे.

दरम्यान, राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकारने तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावी, असं आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता उर्वरित जागा या ट्रस्टला द्यायची किंवा काय? याचा निर्णय सर्वस्वी सरकारचा असणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

Shri Ram Jai Ram Jai Jai Ram ! May there be peace, unity and brotherhood

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या