बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठोकर खाके आदमी ठाकूर बनता है!; मराठमोळ्या शार्दुलचं विरुकडून कौतुक

पुणे | महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियममध्ये ओडीआय सामना खेळला जात आहे. आज या मालिकेतील सामन्याचा तिसरा टप्पा पार पडत आहे.  या निर्णायक सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने 329 धावांचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं.

इंग्लंडने बॅटिंग करायला सुरुवात केल्यानंतर जेसन रॉय व जॉन बेयरस्टो हे लवकरच बाद झाल्याने इंग्लंडला मोठा धक्का बसला. शार्दुल ठाकूरने बटलर, मलान आणि लियाम यांना बाद केल्याने भारतीय संघाची विजयाकडे आगेकूच होण्यास खूप मदत झाली.

इंग्लंडच्या खेळाडूंनी आपली धमाकेदार खेळी सुरू ठेवली. त्यामुळे हा सामना अधिकच चुरशीचा बनल्याचं दिसून आलं. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने शार्दुल ठाकुरच्या बॉलिंगवर आनंदी होऊन शार्दुलचा एक फोटो ट्विट केला आहे. शार्दुल ठाकूरचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत ‘ठोकर खाकर आदमी ठाकूर बनता है! गेम चेंजर शार्दुल चा विजय असो!!’ असा मजकूर लिहून ट्विट केलं आहे.

वीरेंद्र सेहवागच्या ट्विटनंतर शार्दुलवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना पाहायला मिळाला. पुणे येथे होत असलेल्या या ओडीआय सामन्याचा तिसरा आणि निर्णायक सामना खेळला जात असून 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर आजचा हा सामना चुरशीचा बनला आहे. तसेच सर्वच क्रिकेटप्रेमींचं आजच्या या सामन्याकडे लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पैसे खात नाही असा अधिकारी-कर्मचारी पोलीस दलात नाही- निवृत्त IPS मीरा बोरवणकर

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढ काही थांबेना, आजही आकडेवारी धडकी भरवणारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पारंपारिक नृत्य करून साजरी केली होळी, पाहा व्हिडिओ

सचिन वाझेच्या अडचणीत आणखी वाढ; NIA पथकाला नदीपात्रात आढळले महत्वाचे पुरावे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More