विरेंद्र सेहवाग भाजपकडून निवडणूक लढवणार नाही?

वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली | भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. गौतम गंभीरला दिल्लीमधून भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते.

विरेंद्र सेहवागनं पश्चिम दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून भाजपनं विचारणा केली होती, पण सेहवागनं वैयक्तिक कारणांसाठी नकार दिला, असल्याची माहिती मिळत आहे.

गौतम गंभीरला भाजपकडून दिल्लीतून लोकसभा मिळण्याची शक्यता असून गंभीरनं गेल्या आठवड्यात भाजप नेत्यांची भेट घेतली होती.

दरम्यान, नवी दिल्लीतून गौतम गंभीर किंवा मोनिका अरोरा यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. 

महत्वाच्या बातम्या-

निवडणुकीच्या तोंडावर रामदास आठवलेंना मोठा धक्का?

-पेटीेेएमवर बंदी आणा, स्टॅच्यु ऑफ युनिटी चीनला माघारी पाठवा- जितेंद्र आव्हाड

निवडणूकींच्या तोंडावर मराठ्यांचा पुन्हा एल्गार?

-राष्ट्रवादीच्या आमदारांना मीच निवडून आणणार- उदयनराजे

-स्मृती इराणींच्या खासदार निधीच्या वापरात गैरव्यवहार?; निधी परत करण्याचे कोर्टाचे आदेश