बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत तेवढ्या वेळा…’; सेहवागचा पंजाब किंग्सवर निशाणा

मुंबई | मंगळवारी झालेल्या पंजाब किंग्ज आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये रॉयल्सने विजय मिळवला. पंजाबच्या तोंडचा विजय राजस्थान रॉयल्सच्या संघाने हिसकावला. कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात केलेली गोलंदाजी अप्रतिम होती.

के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते तेव्हा पंजाब एकहाती सामना जिंकणार असं वाटत होतं. मात्र दोन्ही सलामीवीर गेल्यावर पंजाबची अवस्था दयनीय झाली. त्यानंतर दबावाखाली आलेल्या पंजाबच्या फलंदाजांना राजस्थानने गुंडाळलं. यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने पंजाब किंग्सवर टीका केली आहे.

बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत, जितक्या वेळा पंजाब किंग्ज त्यांच्या संघातले खेळाडू बदलतात. पंजाब किंग्जचे सामन्यासाठीचे अंतिम 11 खेळाडू कोणते असतील, याचा अंदाज बांधणं फारच कठीण आहे, असं विरेंद्र सेहवाग म्हणाला.

शेवटच्या षटकात राजस्थान संघाला विजयासाठी 4 धावांची आवश्यकता होती. राजस्थानकडून कार्तिक त्यागी षटक टाकत होता. मात्र युवा गोलंदाजाने पाच निर्धाव चेंडू टाकले, 2 गडीही बाद केले आणि संघाला विजय मिळवून दिला होता. युवा गोलंदाजासमोर स्फोटक फलंदाज पुरन होता मात्र त्याने दबाव न घेता गोलंदाजी केली. पंजाबच्या तोंडचा विजय हिसकावला.

थोडक्यात बातम्या- 

‘तुम्ही माझ्या पाया नका पडू, मीच तुमच्या पडतो’; ‘या’ मराठमोळ्या कलाकारासमोर झुकले महानायक!

महिला सुरक्षेबाबत नाना पटोलेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

“प्रभू श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य!

भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनचा यु-टर्न; भारतीय नागरिकांना मोठा दिलासा

”आपलं कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More