Top News

“असा अचानक झालेला काळाचा घाला सर्वांना धक्का देणारा आहे”

पुणे | राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं आज निधन झालंय. यानंतर पत्रकार-शेतकरी आंदोलक विरेश आंधळकर यांनी भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विरेश आंधळकर म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा शरद पवारसाहेब यांची पंढरपूरात आमदार भारत नाना भालके यांच्या घरी भेट झाली होती. शेतकऱ्यांच्या अडचणी पवार साहेबांना सांगतेवेळी भारत नाना देखील सर्व ऐकत होते. त्यांनी आस्थेने सर्व गोष्टी विचारल्या.विशेष म्हणजे राज्यपाल यांनी टाळलेली भेट आणि त्यावर घडलेल्या सर्व गोष्टी नानांनी ऐकल्यावर ‘पोरांनो चांगलं काम करताय’ म्हणून कौतुकाची थाप दिली होती.”

ते पुढे म्हणाले, “पत्रकार म्हणून आजवर अनेकवेळा त्यांची भेट झालेली, मुंबई पुण्यात भेटल्यावर आपल्या जिल्ह्यातला आमदार म्हणून नानाशी आवर्जून बोलणं होयचं. त्यांची शेतकरी आणि आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकांसाठी काम करण्याची धडपड दिसून येत.”

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला पैलवान माणूस राज्याच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करतो, अन् अचानक असा झालेला काळाचा घाला सर्वांना धक्का देणारा आहे… भावपूर्ण श्रद्धांजली!

महत्वाच्या बातम्या-

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला- उपमुख्यमंत्री अजित पवार

भारत भालके यांचं निधन चटका लावणारं; कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपलं- शरद पवार

“गोरगरिबाचं पोरगं राजकारणात येऊन यशस्वी होऊ शकतं, हे आपण सिद्ध करुन दाखवलं”

“मतदारसंघाच्या विकासासाठी भालके नेहमी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला”

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या