बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हारलोत तर मेहनत करणार आणि जिंकलोत तर अजून मेहनत करणार”

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल यायला सुरू झाला आहे, आणि सुरूवातीलाच स्पष्ट होतंय की जनतेने अरविंद केजरीवाल यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवायचं ठरवलं आहे. यातच आम आदमी पक्षाच्या समर्थनार्थ ‘हारलोत तर मेहनत करणार आणि जिंकलोत तर अजून मेहनत करणार’, असं ट्विट प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी केलंय.

निकालाचं वातावरण खूप तणावपूर्ण आहे आणि मी तुम्हाला निकालानंतर पून्हा भेटतो, असं ददलानी म्हणाले आहेत. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. विशाल ददलानी नेहमीच आम आदमी पक्षाच्या समर्थनार्थ बोलताना दिसतात.

मी पुन्हा भेटेपर्यंत आशा आहे की जे देशासाठी चांगलं असेल तेच पाहायला मिळेल. मी आपच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आज जर आपण जिंकलो तर तुम्ही एकनिष्ठ राहा आणि नेहमी जमिनिशी जोडून राहा, असंही ददलानी ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दिल्लीत जनतेने आम आदमी पक्षाकडून जनादेश दिल्याचं दिसून येत आहे. ददलानी हे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या राजनितिचे मोठे समर्थक असल्याचं नेहमीच दिसून येतं आणि दिल्लीच्या निवडणूक प्रचारावेळीही त्यांनी सहभाग घेतला होता.

 

ट्रेंडिंग बाचम्या –

“सदा न् कदा आम्हीच राज्य करू हा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला”

शेवटच्या निकालात चित्र पलटणार; राम कदमांचा विश्वास

महत्वाच्या बातम्या –

भाजप खासदार म्हणतो…केजरीवालांचा मोफत वीज देण्याचा निर्णय आवडला

अभिनेत्री तेजश्री प्रधानचं ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

मोदींचा सल्ला ऐकत दिल्लीकरांनी भाजपला देशद्रोही घोषित केलं- नवाब मलिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More