बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला विकत घेण्यासाठी भाजपला अनेक अंबानी उभे करावे लागतील”

सांगली | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातु आणि काँग्रेस प्रदेशउपाध्यक्ष विशाल पाटील यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे. आम्हाला विकत घेण्यासाठी भाजपला अनेक अंबानी उभे करावे लागतील, असं विशाल पाटील म्हणाले आहेत.

स्वातंत्र्याच्या लढाईत चड्डी घातलेली लोकं इंग्रजांबरोबर होते. आता दुर्दैवाने आपल्या नाकर्तेपणामुळे दिल्लीचे तख्त त्यांना मिळाले. तसेच वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला भाजपला अजुन खुप घोटाळे करावे लागतील, अशी टीका विशाल पाटील यांनी केली. दिशा संवाद या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना विशाल पाटील यांनी राज्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार केला आहे.

वसंतदादांचे विचार पैशावर निर्माण झाले नाहीत, विचारांनी गर्दी होते. या घराण्याचं राजकारण सत्तेवर टिकले नाही, असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. मला इतर पक्षांकडुन खुप फोन आले, मला काँग्रेसने प्रदेशउपाध्यक्ष पद दिलं आहे, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, काही लोकं जे बसले आहेत, देश चालवत आहेत. ते त्यांचा जुना राग काढतात. यापुढील काळात कार्यकर्ते आणि स्वत:च्या ताकदीच्या जोरावर पदं आणि उमेदवारी मिळवू, असा आशावादही पाटलांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

सिद्धार्थ शुक्लाची अखेरची खास पोस्ट व्हायरल, जाणून घ्या काय आहे कारण!

‘…अन् बॉडीबिल्डरचा फुटला बायसेप’; इंजेक्शन घेऊन बायसेप्स फुगवणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, पाहा व्हिडीओ

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी आधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

“वडेट्टीवार हा जातीयवादी माणूस”; विनायक मेटेंना वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

तालिबान्यांना जूगारून अफगाणिस्ताच्या रणरागिणी उतरल्या मैदानात, केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More