बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूरस्थितीनंतरच्या मागण्यांसाठी विश्वजित मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; बाळासाहेबांची मात्र दिल्लीवारी!

मुंबई । कोल्हापूर-सांगलीच्या पूरस्थितीनंतरच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याच वेळी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मात्र सोनिया गांधींना भेटण्यासाठी गेले होते.

सांगलीत पूरस्थितीमुळे झालेली वाताहत विश्वजित कदमांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. तसेच त्यांनी उपाययोजनांसह विविध मागण्याही मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

दुसरीकडे बाळासाहेब थोरात दिल्लीला सोनिया गांधींच्या भेटीला गेले होते. यावेळी महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत सोनिया गांधींना माहिती दिल्याचं त्यांनी स्वत:च्या ट्विटरवर सांगितलं आहे.

दरम्यान, बाळासाहेबांनी एकट्याने सोनिया गांधींची परस्पर भेट घेतल्यानं राज्यातील काॅंग्रेसचे बडे नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-“आम्ही आमदार शोधतो आणि तेजस पाली शोधतोय”- आदित्य ठाकरे

-हृतिक रोशन ठरला ‘मोस्ट हॅन्डसम मॅन इन द वर्ड’

-“काँग्रेसची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे”

-सोलापुरात राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसणार?? हे विद्यमान आमदार शिवसेनेत प्रवेश करणार

-पुण्यातले बस कंडक्टर कुंदन काळे ठरतायेत कौतुकाचे धनी; केला ‘हा’ अनोखा विक्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More