बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दूरदृष्टी! कोविडकाळात व्हायरल होतोय अटल बिहारी वाजपेयींचा ‘हा’ व्हिडीओ

मुंबई |  पैशांपेक्षा माणसं महत्वाची असतात, याची जाणिव सर्वांना या कोरोना महामारीच्या काळात झाली आहे. याच कोरोना काळात काळ्या बाजाराला उधाण आलं आहे. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन सिलेंडरचा सर्रास काळाबाजार होत असल्याचं समोर येत आहे. त्यात आता भारताचे माजी पंतप्रधान आणि बेधडक वक्ते अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते सर्वांना नैतिकतेची जाणिव करून देत आहेत.

“पैशाने औषधं खरेदी केली जाऊ शकतात, पण आरोग्य खरेदी करू शकत नाही. भौतिक सुखं सुद्धा पैशाने विकत घेता येतात. वैज्ञानिक प्रगतीने माणूस वेगवेगळी शिखरं पार करतो, पण या धरतीवर कसं चांगल्या पद्धतीनं जगायचं, हे त्याला उमगत नाही. हे शिक्षण, हे संस्कार त्यांना कोण देणार?”, असं अटल बिहारी वाजपेयी या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

आपण वर्तमानात जगतोय, पण आपल्याला भविष्याकडे बघावं लागेल. आपण गोवर, क्षय या रोगांवर विजय मिळवला. अगदी चंद्रापर्यंत पोहोचलो. पण इथे पृथ्वीवर जिवंत कसं राहायचं कसं जगायचं हे अजून कळत नाही.मनात दुःख, भीती, पीडा असेल, बैचैनी असेल तर साक्षात कुबेराची संपत्तीसुद्धा सुखाचा आनंद देणार नाही. विज्ञान जीवन समृद्ध करतो तसं विनाशसुद्धा करू शकतो, असं अटल बिहारी वाजपेयी या व्हिडीओ मध्ये सांगत आहेत.

दरम्यान, अटल बिहारी वाजपेयींनी जणू भविष्यकाळातल्या या भयंकर साथीला उद्देशूनच असं म्हटल्याचं वाटतं आहे. भौतिक समृद्धीत सुख आहे का हे शोधावं लागेल, असाही सल्ला ते यामधून देताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

कोरोनावर प्रभावी औषध शोधल्याचा दावा, महाराष्ट्रातील सांगलीत उत्पादन सुरु

“पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला महिन्याला 29 कोटी डोस देणार”

क्वारंटाईन संपलेल्या आजोबांना आणायला गेले नातेवाईक, समोर आला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’; गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More