बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन (Ukrain) युद्धाचे परिणाम सगळीकडे पहायला मिळत आहेत. रशिया सध्या युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आक्रमण करत आहे. हे हल्ले औद्योगिक क्षेत्र लुहान्सकमधे होत आहेत. सध्या हे हल्ले थांबवण्यात आले आहेत. मात्र, युक्रेन सरकारने दक्षिणेकडील रशियन नियंत्रित प्रदेशातील रहिवाशांना कोणत्याही किंमतीत क्षेत्र सोडण्याचे आवाहन केले आहे.

याचदरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी (Volodymyr Zelensky) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी 5 देशांमध्ये नियुक्त केलेल्या राजदूतांना हटवले आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. जर्मनी, भारत, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे आणि हंगेरी येथील युक्रेनच्या राजदूतांना बडतर्फे केल्याची घोषणा राॅयटर्सने केली आहे. याचे कारण सध्या अस्पष्ट आहे.

रशियन सैन्याने रात्रीच्या वेळी प्रांतात 20 हून अधिक मोटार आणि रॅाकेट डागले. रशियाचे सैन्य डोनेस्तक सीमेवर घुसण्याचा प्रयत्न करत होते. युक्रेन देखील बाहेरून रशियन (Russian) सैन्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे, अशा आशयाचा एक व्हिडीओ लुहान्सकेचे गव्हर्नर सेर्ही हेदी यांच्याद्वारे सोशल मिडीयावर शेअर करण्यात आला आहे.

युक्रेनच्या पंतप्रधान इरिना व्ही. यांनी रशियन नियंत्रणाखाली असलेल्या देशाच्या दक्षिणेकडील भागात राहणाऱ्या लोकांना शक्य तितक्या लवकर क्षेत्र सोडण्यास सांगितलं आहे. जेणेकरून रशियन सैन्य तुम्हाला ढाल म्हणून वापरणार नाही. नागरिकांनी त्या क्षेत्रातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आमचे सशस्त्र दल नियंत्रण मिळवण्यासाठी या भागात लवकरात लवकर पोहचेल अशी माहिती दिली. या युद्धादरम्यान मृत पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी झालेल्या ऱशियन बाॅम्ब हल्यात पाच जण ठार आणि आठ जखमी झाले आहेत.

थोडक्यात बातम्या

“शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीसांनी दाढी-मिश्यासुद्धा लावल्या असतील”

भाजप नेत्याचा मोठा दावा, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोटात खळबळ

प्रसाद लाड यांच्या घरासमोर सापडला लाखांचा खजिना, वाचा सविस्तर

‘उद्धव ठाकरेंना भेटणार का?’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं, पंढरपूरच्या विकासाबाबत केली महत्त्वाची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More