बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; कोण मारणार बाजी?

पंढरपूर | राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात नव्यानं पोटनिवडणूक लागली आहे. भारत भालके यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीने भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपने बिनविरोध निवडणुकीची परंपरा मोडीत काढत समाधान आवतडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर प्रचारसभांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आज शनिवारी मतदान प्रकिया पार पडत आहे.

दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. 2009 मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेवर जिंकून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या आधी म्हणजेच शुक्रवारी ईव्हीएम मशिन सह इतर आवश्यक सर्व साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. तर मतदानानंतर इतर राज्याप्रमाणे पंढरपूरात देखील पण जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहे.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 914 मतदार आहेत. त्यात 1 लाख 43 हजार 746 महिला तर 1 लाख 59 हजार 167 पुरुष मतदार आहेत. तसेच या निवडणुकीसाठी 2552 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो, पण…’; समोर आली ही महत्वाची माहिती

“…तर मग कुंभमेळाव्यातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा?”

“याला म्हणतात ठाकरे ब्रँड; राजसाहेबांचं पत्र गेल्यावरच आली हाफकिनची परवानगी”

उच्चशिक्षित आईनं 6 महिन्यांच्या चिमुकलीसोबत केला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार!

“पोलिसांना मदत करा, त्यांना चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवणही द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More