बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीसाठी रुग्णवाहिकेची वाट पाहून वैतागलेल्या पतीने केलं ‘हे’ कृत्य

भोपाळ | मध्यप्रदेशातील विदिशी जिल्ह्यात गर्भवती कोरोनाबाधित महिलेला वारंवार संपर्क करूनही रुग्णवाहिका भेटत नसल्याने तिचा पती भयंकर वैतागला आणि त्याने व्यक्त केलेल्या संतापामुळे थेट पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. संबंधित घटना विदिशा जिल्ह्यातील पुतली घाट क्षेत्रातील मुखर्जीनगर येथे घडली.

कुशवाह कुटुंबातील गर्भवती महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ती कोरोनाबाधित होती त्यामुळे, तिचा पती सुनील कुशवाहा याने तिच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली होती. पण रात्री 11 पासून 108 नंबरवर सुनील यांनी सतत संपर्क करूनही रुग्णवाहिका आली नाही.

सुनीलने रात्री डॉक्टरांशी बोलणं करून घेतलं. त्यानुसार रुग्णालयात ऑक्सीजन बेड उपलब्ध असल्याची माहिती त्यांना मिळाली पण पत्नीला नेण्यासाठी रुग्णवाहिका येत नसल्याने सुनील हे भयंकर संतापले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता एक रुग्णवाहिका त्यांच्या घरी आली. रात्रभर फोन करूनही रुग्णवाहिका न आल्याने सुनील हे संतापले होते.

सकाळी घरी रुग्णवाहिका दाखल होताच सुनिल यांनी रुग्णवाहिकेच्या चालकासोबत वाद घालायला सुरुवात करत रुग्णवाहिका फोडून टाकण्याची भाषा केली. त्याबरोबरच, ती रूग्णवाहिका आता घरासमोरून कुठेही जाऊ देणार नाही, असं सुनील यांनी चालकाला स्पष्टपणे बजावून सांगितलं. त्यानंतर घाबरलेल्या चालकाने पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुनील यांची समजूत काढत त्यांच्या पत्नीला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यात हस्तक्षेप केला. पण सुनील यांचा राग काही काळ तसाच होता पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जवळपास दोन तासानंतर त्यांच्या पत्नीला रुग्णालयात हलवण्यात आलं.

थोडक्यात बातम्या –

दादा-भाईंना दणका, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘या’ दोन मोस्ट वॅान्टेडला ठोकल्या बेड्या!

सोनम गुप्तानंतर आता पुष्पाचा संदेश चर्चेत; म्हणते दिपुजी मला पळवून न्या!

मोठी बातमी! राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचं कोरोनाने निधन

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो- चंद्रकांत पाटील

ती लिव्ह इन रिलेशनमधून बाहेर पडली, फोनही उचलेना, त्यानं केलं अत्यंत किळसवाणं कृत्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More