मनोरंजन मुंबई

जिवलग मित्र वाजिद खानच्या निधनावर सलमानचं भावनिक ट्विट

मुंबई | बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचं मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. त्यांनी अभिनेता सलमान खान यांच्या बऱ्याचश्या चित्रपटांना संगीत दिलं होतं. त्यांच्या निधनानंतर सलमान खानने भावूक ट्विट करत त्यांच्या प्रति आदरांजली अर्पित केली आहे.

वाजिदसाठी नेहमी प्रेम आणि सन्मान राहिल. वाजिदचं टॅलेंट आणि व्यक्तीमत्व नेहमी लक्षात ठेवेल. खूप सारं प्रेम. तुझ्या सूंदर आत्म्याला शांती ला, अशा शब्दात सलमान खानने शोक व्यक्त केला आहे.

वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारांच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत.

वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.

कोरोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचं निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले त्यांनी…’; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

…अन् मीच पास झालो अशी मला फिलिंग आली, राज्यमंत्री तनपुरेंचं विद्यार्थ्यांना खास पत्र

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारची ‘मराठी ललकार’… सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य

शिवसेनेचे सोशल मीडियावर पेड ट्रोलर आहेत; फडणवीसांचा दावा

रूग्णांचा दिलासा देण्यासाठी पीपीई कीट घालून मंत्री यशोमती ठाकूर थेट कोविड वॉर्डात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या