बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वारकरी सांप्रदायाला पैसा प्रसिद्धीची गरज नाही- शिवलीला पाटील

मुंबई | नवरात्रीनिमीत्त बुलडाणा येथे प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील हिचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. मात्र या कीर्तनाला वारकरी सांप्रदायाने नकार दिला. तसेच आयोजकांनी नकार दिल्यानंतर देखील कीर्तन रद्द न केल्याने तीन आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरुन शिवलीला पाटीलने तिची भूमिका मांडली आहे.

शिवलीला पाटीलने मराठी बिग बाॅस शोमध्ये सहभाग घेतला होता. मात्र प्रकृती खालावल्याने तिने स्वतः बिग बाॅसचं घर सोडलं. तरी एक वारकरी अशा शोमध्ये सहभागी झाल्याने वारकरी सांप्रदायाने नाराजगी व्यक्त केल्याचं दिसत आहे. यावरुन मी बिग बाॅसमध्ये शहरातील लोकांना कीर्तन काय आहे? हे समजून सांगण्यासाठी गेले होते, असं शिवलीला पाटीलने म्हटलं आहे.

पैसा आणि प्रसिद्धीसाठी शिवलीला बिग बाॅसमध्ये गेली असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना मी तिथं फक्त लोकांना कीर्तन, वारकरी सांप्रदाय, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले होते, वारकरी सांप्रदायाला पैसा प्रसिद्धीची गरज नाही, मलाही नाही, असं देखील यावेळी शिवलीलाने म्हटलं आहे.

दरम्यान, या विषयाबाबत बोलताना थोडक्यात सांगायचं म्हणजे एक पंजाबी ड्रेस घालणारी मुलगीसुद्धा एखाद्या फिल्म इंडस्ट्रीच्या व्यासपीठावर जाऊन स्वतःला सिद्ध करु शकते, हे जगाला दाखवून देण्यासाठी मी बिग बाॅसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं शिवलीलाने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चौकशीदरम्यान अटक झाल्यास युवराज सिंगला जामीनावर सोडा – उच्च न्यायालय

ईडीने जप्त केलेल्या डिएसकेंच्या बंगल्यातच झाली चोरी

महाराष्ट्रात वीजेची टंचाई होणार नाही?, ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“युद्ध झाले तर भारताचा पराभव अटळ”

बंजी जंपिंग जीवावर बेतलं, रस्सी तुटली अन् तीन मुलं झाली पोरकी, पाहा थरारक व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More