बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 24 तासात ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई | पुढील 24 तासात मुंबई, पालघर आणि डहाणू येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर ढगांचा कडकडाट आणि वीज देखील कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय जोरदार वारे वाहतील, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी ढगांचा कडकडाट, वीज कोसळणे आणि जोरदार वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसामुळे सखल भागातील रस्ते , रेल्वे मार्ग, प्रभावित होऊ शकतात. लोकल सेवाही प्रभावित होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबईत 17 जुलै सकाळपासून 18 जुलै मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत सांताक्रुझमध्ये 217.5 मिमी, कुलाबा 178.0 मिमी, महालक्ष्मी 154.5 मिमी, बांद्रा 202.0 मिमी, जुहू विमानतळ 197.5 मिमी, राम मंदिर 171.5 मिमी, मिरा रोड 204.0 मिमी, दहिसर 249.5.5 मिमी, भायंदरला 174.5 मिमी पाऊस झाला आहे.

दरम्यान, मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोनामुक्त झालेल्यांना टीबीचा धोका’; आरोग्य मंत्रालयानं दिली महत्वाची माहिती

‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या…’; चित्रा वाघ यांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

डॉक्टरांनी जिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्याने सर्वांनाच बसला धक्का

मुंबईत पावसाचा हाहाकार; विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू

“दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More