बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईसह राज्यात ‘या’ दिवशी अतिवृष्टीचा इशारा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला ‘हे’ आदेश

मुंबई | महाराष्ट्रात मान्सूनचं जोरदार आगमन झालं आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर मुंबईसह उपनगरात धुवांधार पावसाला आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून मुंबईतील बोरीवली, मालाड, अंधेरी, जोगेश्वरी इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली.

मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 10 ते 12 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात येत आहे. राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनानेही सतर्क राहण्यास हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

बुधवार ते शनिवार दरम्यान अतिवृष्टी होणार असल्याने नदीकाठच्या गावांना तसेच मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रशासनाची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडत असताना पाहायला मिळत आहे.

येणाऱ्या 24 तासात कोकण किनारपट्टी मुंबई यांसह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याबरोबरच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या –

महात्मा गांधींच्या पणतीला न्यायालयानं ‘या’ गुन्ह्यांतर्गत सुनावली 7 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा

अबब! अन् तिने चक्क साडीवरच सिलिंडर उचलून केला वर्कआऊट; व्हिडीओ तुफान व्हायरल

“अजित पवार चिरीमिरी खात नाही. संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?”

मोठी बातमी! नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात; जात प्रमाणपत्र न्यायालयाने केलं रद्द

कबीर सिंगच्या प्रितीचा हाॅट अंडरवाॅटर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More