बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यांना पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान

मुंबई | मुंबईसह अन्य जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रायगड जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी जास्त पाऊस पडला. राेहा तालुक्यातील कवाळटे केळघर येथे दरड काेसळली. त्यामुळे राेहा आणि मुरुड तालुक्यातील दळणवळणचा मार्ग बंद झाला. अलिबाग येथे सर्वाधिक 104 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी 3 ते 5 या वेळेत कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांना अक्षरश: धडकी भरविली. विशेषत: मुंबईच्या उपनगरातील सखल भागात पाणी साचते की काय, अशी स्थिती निर्माण झाली हाेती. मात्र सायंकाळी 5 नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान, ठाणे शहरातील गटारे व नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने पाणी तुंबलं होतं. वर्तकनगरात घराची शेड कोसळली आहे. यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली.

थोडक्यात बातम्या- 

शिवसेना सर्टिफाईड गुंडाचा पक्ष, राऊतांच्या वक्तव्यावर अजितदादांनी करुन दिली ‘ती’ आठवण

राज्यातील 10 महापालिकेच्या निवडणूका ‘या’ महिन्यात लागण्याची शक्यता!

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!

12 तास काम करूनही पगार मिळणार कमी; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कोरोनाला रोखण्यासाठी लेंसेटच्या तज्ज्ञांनी भारताला दिले ‘हे’ 8 महत्वाचे सल्ले!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More