बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 2 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | रखरखत्या उन्हानं नागरिकांना हैराण करुन सोडलं आहे. एकीकडे उन्हाची झळ बसत आहे तोच दुसरीकडे अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अशातच हवामान विभागानं काही भागांत पावासाचा अंदाज वर्तवला आहे तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

राज्यात पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात मात्र कोरडे हवामान असल्यानं हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. काडाक्याच्या उन्हातही अवकाळी पावसाच्या हजेरीनं थोडासा थंडावा पहायला मिळत आहे. हवामान खात्याकडूनही अवकाळी पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे.

तामपानात अचानकपणे बदल होत असल्यानं नागरिकांना आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या  – 

“यांच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी टोमॅटो सॉस भरलाय म्हणूनच…”

“किरीट सोमय्या भाजपचा नाचा आणि देवेंद्र फडणवीस त्याचे सूत्रधार”

मुंबईतून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर, टास्क फोर्सने केली महत्त्वाची मागणी

नवनीत राणा आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन?, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

लोकल प्रवाशांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय, आता लोकलमधून कोणी पडलं तर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More