Top News

कुणीही ‘भावी आमदार’ म्हणून आपलं नाव घोषित करु नये; ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई |  कुणीही ‘भावी आमदार’ म्हणून आपलं नाव घोषित करु नये. ज्यांनी लोकसभेला पक्षाचं इमानदारीने काम केलंय. पक्ष त्यांची दखल घेईल, अशी स्पष्ट सूचना वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

महाराष्ट्रातल्या 287 विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना वंचित आघाडीने तसा आदेश दिला आहे. पक्षाने फक्त औरंगाबाद पश्चिममधून अमित भुईगळ यांना विधानसभेची उमेदवारी घेषित केली आहे.

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तशी घोषणाच पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झंझावती सभा घेऊन ‘वंबआ’ने आगामी विधानसभेचं वातावरण सेट केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाचे नेत्यांमध्ये आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठीची रस्सीखेच पाहायला मिळतीये.

महत्वाच्या बातम्या

-एक्झिट पोलचे कल आले… संघ-भाजपच्या भेटीगाटी सुरु झाल्या!

-देशभरातून विविध संस्थांचे एक्झिट पोल; त्यावर अमोल कोल्हे म्हणतात…

-भाजपला सत्ता मिळणार नाही; या एक्झिट पोलचा सर्वात धक्कादायक अंदाज

-विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

-काँग्रेस संपलीच पाहिजे- योगेंद्र यादव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या