बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ रात्री क्रुझवर पार्थ पवार होते का? समीर वानखेडे म्हणतात…

मुंबई | मुंबईतील कथित ड्रग्स प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपच्या मोहीत कंबोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवाला यांनासुद्धा अटक केली होती. मात्र, भाजपने यंत्रणेचा गैरवापर करत त्यांची सुटका केली आहे, असा आरोप मलिकांनी केला आहे. त्यावर एनसीबीने उत्तर दिलं आहे.

मलिकांनी केलेल्या आरोपांवर एनसीबीकडून पत्रकार परिषद घेत मलिकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मलिकांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत, असं एनसीबीनं म्हटलं आहे. आम्ही योग्य तपास करत 14 लोकांना ताब्यात घेतलं आहे आणि ज्यांच्या विरोधात पुरावे सापडले नाहीत, त्या 6 जणांना आम्ही सोडून दिलं आहे, असं म्हटलं आहे. पत्रकारांनी विचारलं की, एनसीबीने ज्या 6 जणांना सोडलं आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार होते का? असा प्रश्न पत्रकारांकडून विचारला गेला.

पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले की, तुम्ही जी नावं विचारत आहात त्यावर मी एकच सांगू शकेल की या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे. कोणाचंही नाव सांगणं योग्य ठरणार नाही. आम्ही फार जबाबदार अशा संस्थेसाठी काम करतो. आम्ही सर्व पुराव्यानिशी बोलतो, असं वानखेडे यांनी पार्थ पवार बाबत विचारलं असता उत्तर दिलं आहे.

दरम्यान, आज शनिवारी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत काही व्हिडीओस आणि फोटोस प्रसारित केले आहेत. ज्यामध्ये भाजपच्या नेत्यांच्या जवळीक असलेल्यांना सोडून दिलं आहे. तसेच ज्यांना सोडून दिलं आहे त्यांची नावं आमिर फर्निचरवाला, ऋषभ सचदेवा आणि प्रतिक गाबा अशी आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘हा’ तर मनाचा कद्रुपणा म्हणावा लागेल; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्र बंदचा विद्यार्थ्यांना फटका; पुण्यातील महाविद्यालये सुरू होण्याची तारीख बदलली

वाह शिखा वाह! भारतीय गोलंदाज शिखा पांडेने टाकला ‘बाॅल ऑफ द सेंच्यूरी’!; पाहा व्हिडीओ

‘नवाब मलिक आपल्या जावयाला वाचवण्यासाठी मुद्दाम…’; मलिकांच्या आरोपावर दरेकरांची टीका

मी रखेल किंवा बाजारू असेल तर, मी धनंजय मुंडे यांच्यासोबत… – करूणा शर्मा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More