भारताने जिंकलेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता?

Photo- AP

कोलंबो | २०११ सालचा विश्वचषक भारताने जिंकला होता. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या श्रीलंकेच्या पराभवाची चौकशी करण्याची मागणी माजी श्रीलंकन खेळाडू अर्जुन रणतुंगा याने केली आहे. तसेच हा सामना फिक्स असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

२००९ साली पाकिस्तानात श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. त्यामुळे हा दौरा कुणाच्या सल्ल्याने आखला गेला होता, अशी मागणी कुमार संगकाराने केली होती.

त्यावर प्रत्युत्तर देताना २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची चौकशी करण्याची मागणी रणतुंगाने केलीय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या