बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनाकारण बाहेर पडणारांनो ‘हा’ व्हिडीओ पाहा, बाहेर पडायची हिम्मत होणार नाही!

नाशिक | कोरोनाने देशभरात हैदोस घातला. आपल्या समोर चालत-बोलत असलेल्या जवळच्या माणसांना कोरोनाने आपलं शिकार बनवलं आहे. ज्यांची घरच्या घरं बसली त्यावरून तरी या आजाराचं गांभीर्य ओळखायला हवं. राज्य सरकारने स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांना लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचा सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

या लॉकडाऊनमध्येही काही बेजबाबदार नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पण तरीही काहीजण विनाकारण बाहेर फिरत आहेत. सूचना देऊनही जर ऐकत नसतील पोलिसही आपल्या पद्धतीने अशांना प्रसाद देत आहेत.

नाशिकमध्ये जवळजवळ 22 मेपर्यंत लॉकडाऊन आहे.  रस्ता, चौक, शॉपिंग कॉम्प्लेक्स, नागरी वस्ती,बाजारपेठेत काहीजण फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांनी फटके दिले. पोलिसही कितीवेळा सूचना देणार, शेवटी त्यांनीही आपला दंडुका हातात घेत नागरिकांना प्रसाद द्यायला सुरूवात केली आहे. शहरातील 13 प्रमुख नाक्यावर पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

दरम्यान, कोरोना आजार इतका घातक असतानाही लोक विनाकारण का फिरतात?, पोलीस कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. हा आजार खूप मोठा आहे. पोलिसांनी सांगून आपण घरी राहण्यापेक्षा बाहेर देशात कोरानाने किती बळी घेतले आहेत?, याचा विचार करून तरी बाहेर पडावं की नाही, याचा निर्णय घ्यावा.

 

थोडक्यात बातम्या- 

सर्वात जास्त प्रभावी मानली जाणारी ‘ही’ लस भारतात दाखल, जाणून घ्या कधीपासून मिळणार

व्हायरल झालेल्या ‘या’ व्हिडीओमागे आहे दर्दनाक कहाणी, तरीही लढतेय तरुणी

सोलापूरची तरुणी स्वत:च्या पॅाकेटमनीमधून करते असं काम की अभिमान वाटेल!

कपडे वाळत घालण्यावरुन झालेल्या भांडणाने गाठलं टोक; घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

मोठी बातमी! 27 जूनला होणारी UPSC परीक्षा रद्द, नवी तारीख जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More