मुंबई | शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा युती केली म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाकरे सिनेमाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजप आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये अडचणी आल्या की बाळासाहेब ठाकरे मोठ्या मनानं त्या दूर करायचे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
युतीमध्ये अडचणी निर्माण झाल्यास मार्ग काढण्याची जबाबदारी आता आमच्यावर असून आम्ही मार्ग काढू, कशाला चिंता करता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ठाकरे सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे, त्यानिमित्त मुंबईत ‘बाळासाहेबांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-मीटू वगैरे काही नसतं, जे होतं ते दोघांच्या सहमतीनेच- अरुणा इराणी
-जेव्हा धोनीचा पारा चढतो आणि आपल्याच संघातील खेळाडूला हासडतो शिवी!
-“लोकशाहीचा गळा घोटण्याचा भाजपकडून प्रयत्न”
-हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा; नीलेश राणेंचा शिवसैनिकांना इशारा
-विरोधक एकवटले आहेत, सावध राहा- रावसाहेब दानवे
Comments are closed.