बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही कलानी आहोत, कलानी कुणाला घाबरत नाहीत”

ठाणे | येत्या काळात राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. अशातच आतापासून राज्यात पक्षांतर होण्यास सुरूवात झाली आहे. यातच आता उल्हासनगरमध्ये मोठी राजकीय खळबळ झाली आहे. उल्हासनगरमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ओमी कलानी यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

उल्हासनगरमध्ये कलानी गटाचा मोठा दबदबा आतापर्यंत राहिला आहे. उल्हासनगर महापालिकेत टीम ओमी कलानी यांच्या 22 नगरसेवकांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्या सर्वांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावरून उल्हासनगरमध्ये मोठी राजकीय खळबळ माजली आहे. भाजपकडून ओमी कलानी यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

भाजपच्या कोणत्याही 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते प्रदिप रामचंदानी यांनी केलं आहे. परिणामी, याबाबत ओमी कलानी यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.  नगरसेवक आले म्हणजे त्यांच्या पत्नी आणि परिवार सुद्धा राष्ट्रवादीत आले. जे स्वत: स्विकृत नगरसेवक आहेत त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही कलानी आहोत, आम्ही कुणाला घाबरत नाही, असं ओमी कलानी म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात उदगीर, उल्हासनगर येथील पक्षांतराचा थेट फायदा राष्ट्रवादीला झाला आहे. परिणामी सध्या राज्यात राष्ट्रवादी भाजपला खिंडार पाडताना दिसत आहे. विधानसभा 2019 वेळी भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक होती हे विशेष आहे.

थोडक्यात बातम्या 

“…म्हणून मला कधी मंत्री व्हावं वाटलं नाही”

“कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही, आता व्हायचं ते होऊ द्या”

“…म्हणून 2024ला मोदींची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी होणार”

…मग आता वाटतंय एवढ्या दिवस झक मारली – संजय राऊत

“हिंमत असेल तर नारायण राणेंनी रिफायनरीचा प्रस्ताव रेटून दाखवावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More