कोलकाता | आम्ही आरएसएसच्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाही आणि आम्ही कोणासमोरही झुकणार नाही, असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर शांतता युद्ध छेडू आणि कोणाचीही गुंडगिरी येथे चालू देणार नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्या श्चिम बंगालच्या कोचनेर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
भाजपकडून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना भगव्या पक्षात येण्यास भाग पाडलं जात आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी पक्ष सोडणाऱ्यांना संधिसाधू म्हटलं आहे.
भाजपला राजकीय शिष्टाचार माहीत नाही, त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार”
भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- अजित पवार
फेक टीआरपीप्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना जामीन
…तर हे केंद्र सरकाराच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही- बाबा आढाव
विराट-पुजारासाठी नाही तर ‘या’ खेळाडूसाठी केलाय गेमप्लॅन- टीप पेन