बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हे आम्हाला अजिबात आवडलं नाही’; बाळासाहेब थोरात मित्रपक्षांवर भडकले

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करण्याआधीच त्याचं श्रेय घेणं योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे, असं काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. आता यावरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना मोफत लस द्यावी हा आमचा आग्रह आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसा आग्रह धरला असून आमची मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. मुख्यमंत्री मोफत लस देण्याबाबत विचार करत असतानाच श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचं आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली होती.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र नंतर हे ट्विट त्यांनी डिलीट केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

‘अजून काही वर्ष ब्रिटीश भारतात पाहिजे होते’; दिग्दर्शक केदार शिंदे यांची फेसबुक पोस्ट

भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहावेना; सुंदर पिचाई यांनी उचललं मोठं पाऊल!

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘अँड द ऑस्कर गोज टू…’नोमडलँड’; सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं

“महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More