बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला, म्हणाले…

सातारा | खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. विकास कामांचे आम्ही केवळ आश्वासन देत नाही. शब्द देतो आणि तो पाळतो, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

आज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शहरातील स्ट्रीटलाईट शुभारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना उदयनराजे यांनी नगरपालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे, जिने केलेल्या कामच जाहीरपणे ऑडिटचे बोर्ड लावले होते, असा खोचक टोला उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावला आहे.

सातारा विकास आघाडीकडून नागरिकांच्या ज्या अपेक्षा होता, त्या पूर्ण केल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे. तिने केलेल्या कामाचं जाहीरपणे ऑडिट बोर्ड लावले होते, यावेळी केलेल्या कामाची वचनपूर्ती ही झालेली आहे, असं म्हणत उदयनराजे यांनी कामाचा पाढा माध्यमांसमोर वाचला.

थोडक्यात बातम्या- 

उंची वाढवण्याच्या नादात आईने लेकीला दिली आयुष्यभराची शिक्षा!

“Work From Home बंद करा नाहीतर आमचा संसार मोडेल”

…तर तुम्ही केंद्र सरकारलाही देशद्रोही म्हणणार का?- रघुराम राजन

पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठेंना अटक

“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली 113 एकर जमिन मोकळी केली”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More