बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपल्याला हा विषय कायमचा संपवायचा आहे’; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक पत्र देणार असल्याचे सांगितलं होतं. त्यातच आता राज ठाकरे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

मशिदींवरील भोंग्याच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलं नव्हे तर देशातील राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवायला हवा, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

माझं एक पत्र मराठी , इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. ते पत्र त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. कार्यकर्त्यांनी पत्र परिसरातील प्रत्येक घरात नेऊन द्यायचं आहे, असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं आहे.

दरम्यान, व्यापक लोकसहभागाशिवाय हे आंदोलन यशस्वी होणार नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचविण्याच्या कामात तुमच्याकडून कुचराई होणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मशिदींवरील अनाधिकृत भोंगे उतरवले जावेत. अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे संकेत राज ठाकरेंनी दिले होते.

पहा ट्विट –  

थोडक्यात बातम्या- 

राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार?, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली महत्वाची बैठक

‘कोलकातामधील गायक केकेपेक्षा चांगलं गाऊ शकतात’; ‘या’ गायकाचं वादग्रस्त वक्तव्य

चिंताजनक! राज्यात कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ

‘धनंजय मुंडेंनी माझ्या आईची हत्या केली’; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

‘त्या’ व्यक्तीला मी Mercedes-Benz बक्षीस म्हणून देणार- नितेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More