बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्हाला पुन्हा संधी मिळणार, कधी ते सत्तेत तर… – देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार 2 महिने टिकेल, 6 महिने टिकेल, दिवाळीपर्यंत टिकेल असे भाजप वारंवार सांगताना दिसत आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई येथील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही आमच्या सरकारच्या काळात केलं आणखी काही वेळ मिळाला असता तर आम्ही माथाडी कामगारांचा प्रश्न पुर्ण सोडवला असता. हे सरकार तुमचे प्रश्न सोडवेल अशी आशा आहे. नाहीतर आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

लोकशाहीत कमी अधिक होत असतं. कधी ते सत्तेत असतात तर कधी आम्ही सत्तेत असतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नरेंद्र पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर मला माथाडी कामगारांच्या चळवळीचं महत्त्व समजलं, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, माथाडी कामगार युनियनच्या नेत्यांनी दिल्लीत यावं, तुमच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करू आणि सर्व प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

UPSC Result | मराठवाड्याच्या विनायक महामुनीने देशात मिळवला 95 वा क्रमांक

UPSC Result | शेतकरी बापाचे कष्ट फळाला आले; सोलापूरचे शुभम जाधव साहेब झाले

“महाविकास आघाडी सरकारला राज्यात काय चाललय याचा थांगपत्ताच नाही”

मुंबईतल्या शाळा सुरु होणार का?, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

UPSC Result | लातूरच्या नितीशाचा देशात डंका; 21व्या वर्षीच UPSC परीक्षेत यशाला गवसणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More