बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारला धारेवर धरल्याशिवाय आम्ही राहणार नाही- प्रविण दरेकर

मुंबई | विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. तसेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. एक- एक दिवस दिवसाचं अधिवेशन घेऊन हे सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे, असं म्हणत प्रविण दरेकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आज आधिवेशनाचा पहिला दिवस आहे. मराठा व ओबीसी राजकीय आरक्षण, एमपीएसी विद्यार्थ्याची आत्महत्या, शेतक-यांचे प्रश्न आदी विषय सभागृहात मांडायचे आहेत. परंतू ते केवळ एक-दोन दिवसांत कसे मांडणार असा सवालही प्रविण दरेकरांनी केला आहे.

काहीही झालं तरी आम्ही या सरकारला सभागृहाच्या आतमध्ये आणि बाहेर धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला एक सूचक इशारा दिला आहे.

केंद्राच्या कृषी कायद्यामध्ये राज्य सराकार काय दुरूस्ती करणार आहे. त्यावर त्यांना विचारलं असता, त्यामध्ये काही चांगल्या दुरूस्त्या असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतू आम्ही देखील केंद्राचा कृषी कायदा चांगला आहे. हेही त्या ठिकाणी आम्ही सरकारला समजावून सांगू, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नाहीतर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आलेत- भाजप

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा तापली, सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

“भागवतांनी हिंदू- मुस्लीम ऐक्यावर बोलणं म्हणजे RSSने सरड्याप्रमाणे रंग बदलणं”

‘सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा घ्या’; फडणवीस आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More