बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! अन् तिने चक्क साडीवरच सिलिंडर उचलून केला वर्कआऊट; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. कधी हास्यास्पद व्हिडीओ तर कधी कोणालाही रडवेल असा व्हिडीओ व्हायरल होतो. अनेकदा तर काहींच्या स्टंट्सचा व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसत असतो. एवढंच काय तर मुलींच्या वर्कआऊट्स व्हिडीओ तर तुफान धुमाकुळ घालतो. अशातच सध्या एका महिलेच्या व्हिडीओने सर्वांना वेड लावलं आहे. या महिलेने सिलिंडर घेऊन वर्कआऊट करताना व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने लाल रंगाची साडी घातली आहे. तिने अतिशय मनमोहक मेकअपसुद्धा केलाय. लाल साडीमध्ये तिने आपला पदर कंबरेला खोचला असून तिने चांगलीच करामत केली आहे. या तरुणीने थेट गॅस सिलिंडरला उचललं आहे. थोडा प्रयत्न करुन तिने हे गॅस सिलिंडर उचलून धरले आहे. सोबतच गॅस सिलिंडरला घेऊन ती व्यायाम करत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र शैली चिकारा या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 6 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले असून कित्येक नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

वेगवेगळ्या उपकरणांसोबत वर्कआऊट करताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल, पण अशाप्रकारे गॅस सिलिंडरचा वापर पहिल्यांदाच बघत असाल. तसेच सिलिंडर घेऊन अनेक वेगवेगळे वर्कआऊटचे व्हिडीओ या महिलेने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘या’ देशांनी डेल्टा व्हेरियंटपासून सावध रहावं; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

बाबो! 37व्या वेळी विवाहबंधनात 28 बायका, 135 मुलं, 126 नातवंडांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा; पाहा व्हिडीओ

कोरोना चाचण्यांच्या अहवालाची माहिती न देणाऱ्या लॅबचे परवाने होणार रद्द?; कारणे दाखवा नोटीशीनंतरही उत्तर नाही

नाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More