दिवाळी भारतात आणि आतषबाजी केली वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी!

चेन्नई | सध्या भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. चेन्नईत मात्र भारतीय गोलंदाजांची धुलाई करत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जोरदार आतषबाजी केली आहे. 

तिसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने निर्धारित 20 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 181 धावा चोपल्या आहेत. 

वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने अवघ्या 25 चेंडूंमध्ये नाबाद 53 धावा फटकावल्या. तर डॅरेन ब्राव्होने त्याला साथ देत 37 चेंडूत नाबाद 43 धावा फटकावल्या.

भारताने या मालिकेतील याआधीचे दोन्ही सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे. मात्र शेवट गोड करण्यासाठी भारताला आता 182 धावांची आवश्यक्ता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नेता असावा तर असा! 21 कार्यकर्त्यांना फुकट वाटल्या दुचाकी

-शहा हा पर्शियन शब्द; भाजपाध्यक्ष अमित शहांचं नाव बदलण्याची मागणी

-दिवाळीत बंद झालेलं भारनियमन पुन्हा सुरु होणार नाही; उर्जामंत्र्यांची घोषणा

-औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्यासाठी पाठपुरावा करु!

-भाजपऐवजी जेडीयूमध्ये का प्रवेश केला?; पाहा काय म्हणाले प्रशांत किशोर…