बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार’; जयंत पाटलांनी सांगितला मेगा प्लॅन

मुंबई | मराठवाड्यात पाण्याची मोठी समस्या आहे. गेल्या दोन वर्षात मराठवाड्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र त्याआधी मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती होती. सध्या पाऊस चांगला असला तरी मराठवाड्यात पाण्याची समस्या मात्र कायम आहे. त्यातच आता मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मास्टरप्लॅन आखला आहे.

मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर होऊन बसलाय. उन्हाळ्यात मराठवाड्याची स्थिती दयनीय असते. यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकच्या नद्यांचं पाणी मराठवाड्यात आण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची वाहन क्षमता वाढवणार आहे. जायकवाडी धरणाचा गाळ काढला तर त्याच्या पाणी साठ्याची क्षमता वाढेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आगामी काळात गोदावरी नदीवर नवे 782 बंधारे बांधले जातील, असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, भागवत कराड सध्या केंद्रात मंत्री आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी केंद्र सरकारकडून नद्याजोड प्रकल्पासाठी निधी आणावा, असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

बाबो! ‘वर्ल्ड आयकाॅन’ एलोन मस्कने एका दिवसात कमावले तब्बल ‘इतके’ हजार कोटी

“भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा नाहीतर, 2 ऑक्टोबरला जलसमाधी घेणार”

किंग कोहलीने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

उद्या आणि परवा राज्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून खबरदारीचा इशारा

“मी जनरल डायरसारखा प्रचार करत पार्थ पवारला पराभूत केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More