बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काय सांगितलं?; साऱ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर उघड

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर 3 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा सोनारपुर येथे आयोजित केली होती. त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारादरम्यान रॅलीमध्ये सहभागी झालेल्या एका युवकाच्या खांद्यावर हात ठेवून पंतप्रधान त्याचं काहीतरी ऐकत होते, असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

संबंधित तरुणाचं नाव झुल्फिकार अली असं असून त्याचा नमाजी टोपी घालून नरेंद्र मोदीशी कानात काहीतरी संवाद साधतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या युवकाने पंतप्रधानांच्या कानात नेमकं काय सांगितलं? हा प्रश्न साऱ्या देशालाच पडला होता. या प्रश्नाचे उत्तर खुद्द जुल्फिकार आली याने एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिलं आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गाडीमधून खाली उतरल्यानंतर सर्वजण त्यांना नमस्कार करत होते, मी ही त्यांना नमस्कार केल्यानंतर त्यांनी मला माझं नाव विचारलं आणि हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे नाव ऐकू न आल्याने ते माझ्याजवळ आले आणि मग मी त्यांना माझं नाव जुल्फिकार अली असं सांगितलं. त्यानंतर मोदींनी तुला काय बनायचंय असं विचारलं, त्यावर नगरसेवक, खासदार, आमदार यापैकी मला काहीही बनायचं नसून राष्ट्रहितासाठी मी काम करू इच्छितो’, असं या युवकाने मोदींना सांगितल्याचं त्याने स्पष्ट केलं.

झुल्फिकार यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की यापूर्वी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा पार्किंगची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. पण आता या सभेला जाण्याची माझी इच्छा नव्हती आणि मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी गेल्यास खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला भेटतील. पंतप्रधानांना लांबून नमस्कार करावा किंवा एकदा पहावे ही माझी इच्छा होती पण मी त्यांच्या एवढ्या जवळ पोहचेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. असं जुल्फिकारने स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या

सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब; अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर केला गंभीर आरोप

‘शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितले’; सचिन वाझेंचा मोठा गौप्यस्फोट

महेंद्रसिंग धोनीचे ‘सुपर किंग्स’ यंदाही प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाहीत; ‘या’ माजी क्रिकेटपटूचा दावा

पैशांच्या अडचणीमुळे वडिलांनी चक्क आपल्या मुलीलाच विकलं अन्…

कोरोना संकटातून वाचण्यासाठी पुणे प्रशासनानं लष्कराकडे केली ‘ही’ मागणी!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More