बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊत तुरूंगात काय करतात?, महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांना कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली. रोखठोक राजकीय भूमिका घेणारे संजय राऊत गेल्या 22 दिवसांपासून तुरूंगात आहेत.

राजकीय मुद्द्यांवर प्रखरतेने आपलं मत मांडणारे संजय राऊत तुरुंगात पण वेळेचा पुरेपूर वापर करत आहेत. राऊत तुरुंगात बसून पुस्तक लिहीत आहेत. आरोप करण्यात आलेल्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणावर राऊत पुस्तक लिहित असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, या पुस्तकातून संजय राऊत काही गौप्यस्फोट करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाल्यानंतर राऊतांनी काही वेळ माध्यमांशी संवाद साधला व त्यावेळी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More