बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पवार म्हणाले…

नवी दिल्ली | सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामुळे सर्वच खासदार दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठीमुळे राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. अशातच आज गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं, याची सर्वांना उत्सुकता लागून होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याविषयी आता शरद पवार यांनी स्वत: माहिती दिली आहे.

बैठकीत सहकार क्षेत्रासह साखर उद्योग आणि त्यावरील प्रश्नांबाबत चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच या बैठकीला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे हे देखील अपस्थित असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे.

दरम्यान, नुकतंच मोदी सरकारने सहकार खातं चालू केलं आहे. अमित शहा हे देशाचे पहिले आणि नवे सहकारमंत्री आहेत. शरद पवारांचा या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून दबदबा आहे. आता नवं खातं सुरू करण्यात आल्यानं या क्षेत्राशी निगडीत काही समस्या आणि विषयांवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

शरद पवारांनी लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. मात्र, शरद पवार अलिकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“जोपर्यंत कोरोना कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन नाही”

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 11 वर्षांची नताशा ठरली जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी

… अन्यथा आंदोलन करण्यात येईल, एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक!

माझ्या व्यवसायावर लाथ मारू नकोस- गुलशन ग्रोवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More