बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टुलकिट प्रकरणावरून केंद्रात भाजप-काँग्रेस आमनेसामने; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

नवी दिल्ली | भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी एक टुलकिट प्रकरण उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात काँग्रेस टुलकिट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला होता. काँग्रेस कोरोनाच्या भारतीय स्ट्रेनचा उल्लेख मोदी स्ट्रेन म्हणून करत आहे. नेत्यांना ईद मेळाव्याबाबत मौन बाळगण्यास आणि कुंभमेळ्यात कोरोनाचा सुपरस्प्रेडर झाल्याचं सांगायचं, असा हा पुर्ण काँग्रेसचा डाव आहे, असं संबित पात्रा म्हणाले होते.

त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी या प्रकरणात ट्विट केलं होतं. कोरोनाच्या संकटातही त्यात काँग्रेस देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेस या प्रकरणात चांगलीच आक्रमक झाली. जे.पी नड्डा, स्मृती इराणी तसेच भाजप नेते संबित पात्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा, अशी मागणी काँग्रेसने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

‘आपल्या सर्वांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात. वेगळ्या विचारसरणी, मतं आणि श्रद्धा असू शकतात. पण काँग्रेस पक्ष भारतीय स्ट्रेन हा शब्द वापरण्यासाठी इतका उतावीळ का झाला आहे? काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?’ असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपा हा खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले आहेत. टुलकिट प्रकरणाचा विषय माध्यमात चालवून मुळ कोरोनाची स्थिती लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“…मग सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?”

कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली; नवा निष्कर्ष आला समोर

अहमदनगरमधील हनीट्रॅपचं सत्र सुरूच; अधिकाऱ्यासोबत ठेवले शरिरसंबंध अन्…

देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा वाढला

“लसीकरणात भारतालाच प्राधान्य, भारताला गरज असताना आम्ही लस निर्यात केली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More