कोपर्डीच्या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयात काय झालं?

-कोपर्डी खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.

-पीडितेची आई, बहिण आणि कोपर्डीचे नागरिक कक्षातील पहिल्या रांगेत बसले होते.

-कोपर्डी खटल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

-सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी न्यायाधीश सुवर्णा केवले न्यायालयात आल्या.

-जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या याप्रकरणातील तिन्ही दोषींना न्यायालयात आणण्यात आलं.

-तिन्ही दोषींना पोलिसांनी आरोपीसाठी कठड्यात उभं केलं.

-तिन्ही दोषींना त्यांची नावं आणि त्यांच्याविरोधात सिद्ध झालेले आरोप वाचून दाखवण्यात आले.

-जितेंद्र शिंदेचे आरोप वाचण्यात आले त्यावेळी त्याने न्यायाधीशांकडे पाहून हात जोडले.

-पुढच्या पाच मिनिटांत न्यायाधीशांनी निकालाचं वाचन केलं आणि तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.