बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्यांबाबत त्यादिवशी जे घडलं ते चुकीचंच होतं – अजित पवार

पुणे | किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलच घेरलं आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना सोमय्या यांनी ईडी चौकशीची मागणी केली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये झालेला वाद सर्वांनीच पाहिला आहे. या प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर सोमय्या कोल्हापूरला निघाले होते. सोमय्या यांना पोलिसांनी कराड मध्ये अडवल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, सोमय्या यांच्यावर पहिल्या दिवशी झालेली कारवाई चुकीची होती. कोणाला काही पहाणी करायची असेल तर करू द्यावी, असं वक्तव्य अजित पवार यांनी केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सोमय्या यांना आरोप करायचे असतील तर करू द्या. कोणी काय बोलत असेल तर मी काय करू. सोमय्या यांनी पुण्यात येऊन नाव घेऊ द्या किंवा काटेवाडीत येऊन नाव घेऊ द्या. मला यावर काही बोलायचं नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

सोमय्या यांना कोल्हापूर प्रशासनानं जिल्हाबंदी केल्यानंतर राज्यात मोठा गोंधळ झाला होता. सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. आता अजित पवार यांच्या सोमय्या प्रकरणावरील वक्तव्यावरून राज्यात राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

थोडक्यात बातम्या 

“तिला 52 दिवस तुरूंगात ठेवलं, आता राऊतांनी महिला सन्मानाच्या गोष्टी करूच नयेत”

”महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रोप-वे, रस्ते, पूल बांधून देईन”

‘गडकरी साहेबांचा फोन आला, अजित जरा लवकर ये…’; अजित पवारांनी सांगितला किस्सा

”हिंदू खतरे में है, हा तर भाजपचा जुमला, आता भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत”

राज्यात पावसाचा धोका वाढला; ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More