मुंबई | ठाकरेंची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. तसे संकेत खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का? यावर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भाष्य केलंय.
आदित्य यांनी निवडणूक लढवल्यास 100 टक्के आवडेल पण हा निर्णय स्वत: आदित्य आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे, असं नार्वेकर म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवल्यास मतदारसंघ कोणता? असे विचारल्यावर संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा मतदारसंघ असेल, असं उत्तर नार्वेकर यांनी दिलं.
युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांच्या इन्स्टाग्राम पोस्टने आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? यावर चर्चा चालू झाली होती.
महत्वाच्या बातम्या
-राजु शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला; आगामी समिकरणांची नांदी???
-विखेंच्या भाजप प्रवेशाविषयी गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य!
-निवडणूक काळात भाजप राजकिय हिंसेचा शिकार; मोदींचा विरोधकांवर गंभीर आरोप
-काँग्रेस अध्यक्ष कोण असेल?? रणदिप सुरजेवाला यांनी दिला सगळ्या चर्चांना पूर्णविराम
-मोदींच्या शपथविधीला महत्वाच्या नेत्यांना निमंत्रण; पण ‘या’ नेत्याला निमंत्रण नाही
Comments are closed.