बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यायला काही हरकत नाही”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांच्यावर नुकतीचं मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते घरूनच काम करत आहेत. मात्र, आता हिवाळी अधिवेशनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने विरोधकांनी मु्ख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनीही मुख्यमंत्र्याना धारेवर धरलं आहे. याआधी चंद्रकातं पाटलांनी मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंकडे राज्याचा चार्ज द्यावा, असा टोला लगावला होता. त्यानंतर आता पुन्हा चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे राज्याचा चार्ज द्यायला काही हरकत नाही, असं म्हटलं आहे.

“मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत रश्मी ठाकरे यांना राज्याचा थेट चार्ज देता येणार नाही, त्यासाठी त्यांना आधी मुख्यमंत्री बनवावे लागेल. त्यानंतर त्यांना चार्ज द्यायला हरकत नाही” असं वक्तव्य केलं आहे. मात्र, पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना नेत्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, तिकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी अधिवेशानात पेपरफुटी प्रकरणावरून राज्य सरकारला जबाब विचारत निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी या परिक्षेत एका एका पदासाठी लाखोंची बोली लागल्याचा गंभीर आरोप केला आहे.

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशन: ‘तुम्हाला एकतरी परिक्षा घोटाळ्याशिवाय घेता येते का?’; फडणवीस कडाडले

हिवाळी अधिवेशन: ‘त्या’ 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी भाजपकडून अध्यक्षांना अर्ज

हिवाळी अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांची ‘ही’ मागणी अजित पवारांनी केली मान्य

हिवाळी अधिवेशन: “लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री असा प्रकार आज पहिल्यांदाच पाहिला”

Omicron: ‘..तर शाळा पुन्हा बंद होऊ शकतात’; वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More