बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

omicron मुळे मृत्यूचा धोका किती?; दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली | omicron व्हेरिएंटच्या फैलावामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असताना ओमिक्रॉन व्हेरिएंट किती घातक आहे? ओमिक्रॉनमुळे मृत्यूचा धोका किती? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) ओमिक्रॉनच्या प्रसाराला सुरूवात झाली. द.आफ्रिकेतील इन्फेक्शिअस डिसीज डॉ. फरीद अब्दुल्लाह यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटचा अभ्यास केला आहे. ओमिक्रॉनची लक्षणे (Omicron Symptoms) आणि सध्याची परिस्थिती याबद्दल त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

ओमिक्रॉनमुळे रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना पूर्वीप्रमाणे ऑक्सिजनची गरज भासली नाही. द.आफ्रिकेत मागील दोन आठवड्यात फक्त दोन जणांनाच अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज भासली असल्याचंही डॉक्टरांच्या अहवालातून समोर आलं आहे.

बहुतांश रूग्णांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे पण गेल्या 2 आठवड्यांत एकही रूग्णाचा मृत्यू झाला नसल्याचंही समोर आलं आहे. येत्या 2 आठवड्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील आणि भविष्यात परिस्थिती कशी असेल ते ही स्पष्ट होईल,असं डॉ. अब्दुल्लाह यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, सीडीएस बिपीन रावतही जखमी?

अंबानींची दर्यादिली; सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स अव्वल

“ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती”

“मी उत्तर दिल्यावर चंद्रकांत पाटलांची तब्येत बिघडेल”

“शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More