बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगाला टेन्शन देणारा ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ आहे तरी काय?; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | जगाची चिंता वाढवणारा ‘ओमिक्रॉन’ (Omicron) कोरोना व्हेरिएंट या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत आढळल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या (B.1.1.529) या विषाणूला ‘ओमिक्रॉन’ हे नाव दिलं आहे. कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा ओमिक्रॉन व्हेरियंटचा अधिक धोकादायक आहे.

आफ्रिकेतून घेतलेल्या B.1.1.529  नमून्यामध्ये आढळून आलं आहे की, स्पाइक प्रोटीनमध्ये तीसपेक्षा जास्त म्युटेशन्स झाले. तसेच इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील कोरोनाला ओमिक्रॉनला वेगाने पसरवणारा व्हेरियंट म्हटलं आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटची भारतात अजून एकही केस समोर आली नाही. परंतु, खबरदारी म्हणून भारताकडून ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मॉरिशस , बांग्लादेश, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्त्राइल या देशांना हायरिस्क (High risk) यादीत टाकलं आहे. ओमिक्रॉनचे केसेस बेल्जियम, हाँगकाँग, इस्त्राईल आणि दक्षिण आफ्रिका येथील काही प्रवाशांमध्ये सापडत आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत माहिती समोर येताच अनेक देशांनी हवाईसेवा निर्बंध लावण्यास सुरूवात केली आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटला डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक मानलं जात आहे. त्यामुळे नेमका धोका शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आपत्कालीन बैठका घेत आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या तज्ञांनी सांगितलं आहे की, ओमिक्रॉन व्हेरियंटमने अधिक गंभीर किंवा असामान्य आजार होऊ शकतात असे कोणतेही संकेत नाहीत. जगात उपलब्ध असलेल्या कोरोना लसी नविन ओमिक्रॉन व्हेरियंट विरोधात किती प्रभावी आहेत, हे तपासण्यासाठी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

बापानं केलं असं काही की, अरबाज मर्चंटने मारला डोक्यावर हात; पाहा व्हिडीओ

…अन् राज्यपाल म्हणाले,”मी आजच्या आज राजीनामा देतो”

‘बिग बुल’ झुनझुनवालांना जोर का झटका! झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More