बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या भावात काय चाललंय? आज ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं सगळीकडे थैमान घातलं आहे. या काळात अनेक वस्तूंच्या किंमती महागल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला. यामधे इंधन दरवाढीत चढउतार पहायला मिळाले. त्याचबरोबर सोनं-चांदीच्या दरामध्येही चढ-उतार पहायला मिळाले.

सोन्याकडं एक उत्त्म गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे भारतीयांचा सोनं खरेदी करण्याकडे जास्त कल असल्याचं पहायला मिळतं. भारतात मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं जातं. ऐन सणासुदीच्या मुहुर्तावर तर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.

आज सोन्याचा भाव 0.24 टक्क्यांनी वाढला असून सध्या सोनं 47,551 रुपये प्रति तोळा झालं आहे. तर चांदी 0.32 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर 1 किलो चांदी 62,836किलो झाली आहे.

दरम्यान, महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते. त्यामुळे देशात सोन-चांदीचे भाव नेहमीच गगनाला भिडलेले पहायला मिळतात. रोज सोनं-चांदीच्या भावात चढ-उतार सुरुच असतात.

थोडक्यात बातम्या –  

धक्कादायक! गौतम गंभीरला मिळालेली जीवे मारण्याची धमकी पाकिस्तानातून

‘मला गुंडगिरीच करायची असती तर मी…’; शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंना टोला

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवलं, आता…

“हे आंदोलन त्यांनी उभा केलंय, आता निर्णय देखील त्यांनीच घ्यावा”

नवाब मलिकांना मोठा दणका! मुंबई उच्च न्यायालयाने दिली ‘ही’ सूचना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More