चीनमध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामनंतर व्हॉट्सअॅपवर बंदी

नवी दिल्ली | फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामनंतर चीनने आता व्हॉट्सअॅपवर बंदी घातल्याची माहिती आहे. चीनमधील अनेक व्हॉट्सअॅप धारकांना फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात अडचण होत आहे. तसेच व्हॉट्सअॅपवरुन संवादही साधता येत नाहीये.

चीन सरकार नागरिकांच्या वैयक्तीक संभाषणांवरही नजर ठेवतं. मात्र व्हॉट्सअॅपमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फिचर असल्याने सरकारला या संभाषणांवर नजर ठेवता येत नाही. 

तसेच चीनमध्येच डाटा सेंटर खोलण्यासाठी व्हॉट्सअॅपवर दबाव येत होता, मात्र त्यांनी तसं न केल्यामुळे ही बंदी घातल्याची शक्यता आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या